ALL न्युज राजकारण मराठी / हिंदी सिनेमा टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पिंपरी - चिंचवड काॅंग्रेस शहर अध्यक्ष पदाकरिता मुलाखती मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत निगडी येथे होणार
November 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

*पिंपरी - *चिंचवड काॅंग्रेस शहर अध्यक्ष *पदाकरिता मुलाखती*

*मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत निगडी येथे होणार* 

 *पिंपरी,:-* पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला आहे. राजीनामा मागे घेण्यास साठे यांनी नकार दिल्यामुळे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड निरीक्षक शरद आहेर हे मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत निगडी प्राधिकरण येथील हरीदास नायर यांच्या कार्यालयात (सेक्टर २७, ॲक्सिस बँक जवळ) इच्छुकांच्या मुलाखती घेतील. यावेळी इच्छुकांनी व शहर कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे.