ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पीक कर्ज वाटपाचे उद्द‍िष्टय वेळेत पुर्ण करा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना
June 25, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

*पीक कर्ज वाटपाचे उद्द‍िष्टय वेळेत पुर्ण करा*

 

 सोलापूर, दि. २४ : पीक कर्ज वाटपाचे उद्द‍िष्टय वेळेत पुर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आज पीक कर्ज वाटप आणि खरीप हंगामाबाबत बैठक झाली. बैठकीस महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, उपायुक्त राजाराम झेंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे उपस्थित होते.

  विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी खरीप हंगाम आणि पीक कर्ज वाटपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाबाबत तर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी कर्ज वाटपाबाबत सादरीकरण केले. 

 डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले की, बँकांनी पीक कर्ज वितरणासाठी शेतकऱ्यांकडून फार कागदपत्रांची मागणी करु नये. शेतीचा 7/12 आणि 8-अ चे ऑनलाईन उतारे ग्राह्य धरण्यात याव्यात. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज देण्यात यावे. पीक कर्जाचे कमी उद्द‍िष्टय साध्य केलेल्या बँकांनी 15 जुलैपर्यंत कर्ज वाटप करण्यासाठी गतीने काम करावे.

बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे प्रशासन शैलेश कोतमिरे यांनी जिल्हा बँकेची परिस्थिती आणि पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बँकानी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना फिजिकल टिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सुध्दा उपाय योजनांचा अवलंब करावा, असे सांगितले. 

 आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकाने पीक कर्जवाटपात उद्द‍िष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याबद्दल विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी या दोन्ही बँकांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. *बियाणे, खते यांची गुणवत्ता तपासावी*

 जिल्हायातील खरीप हंगामाचे नियोजन काटेकोर करा, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना डॉ.म्हैसेकर यांनी दिल्या. शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. बियाणे खते यांची गुणवत्ता तपासून घ्या. तक्रार आल्यास कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

  या बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.