ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;* *विभागात कोरोना बाधित 1 लाख 62 हजार 884 रुग्ण                                         *-विभागीय आयुक्त सौरभ राव*
August 17, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

*

  पुणे, दि. 16 :- पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 992 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 22 हजार 397 रुग्णांपैकी 93 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.44 टक्के आहे. 

सातारा जिल्हा

   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 129 रुग्णांपैकी 3 हजार 644 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हा

    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 195 रुग्णांपैकी 8 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

सांगली जिल्हा

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 5 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 158 रुग्णांपैकी 6 हजार 214 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 569 आहे. कोरोनाबाधित एकूण 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 103 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 432, सातारा जिल्ह्यात 293, सोलापूर जिल्ह्यात 446, सांगली जिल्ह्यात 355 तर कोल्हापूर जिल्ह्यात 577 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 93 हजार 4 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 62 हजार 884 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

(टिप :- दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

***