ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे विभागातील 1 लाख 30 हजार 987 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;* *विभागात कोरोना बाधित 1 लाख 83 हजार 821 रुग्ण*                                       *-विभागीय आयुक्त सौरभ राव*
August 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

पुणे, दि. 21 :- पुणे विभागातील 1 लाख 30 हजार 987 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 83 हजार 821 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 47 हजार 949 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.3 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 35 हजार 837 रुग्णांपैकी 1 लाख 2 हजार 851 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 29 हजार 765 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.72 टक्के आहे. 

सातारा जिल्हा

   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 671 रुग्णांपैकी 4 हजार 918 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 476 आहे. कोरोनाबाधित एकूण 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हा

    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 849 रुग्णांपैकी 10 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 638 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

सांगली जिल्हा

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 585 रुग्णांपैकी 3 हजार 886 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 435 आहे. कोरोनाबाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 879 रुग्णांपैकी 9 हजार 117 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 277 आहे. कोरोनाबाधित एकूण 485 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 331 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 544, सातारा जिल्ह्यात 396, सोलापूर जिल्ह्यात 376, सांगली जिल्ह्यात 276 तर कोल्हापूर जिल्ह्यात 739 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 70 हजार 657 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 83 हजार 821 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

(टिप :- दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

***