ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे विभागातील 1 लाख 57 हजार 803 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 2 लाख 16 हजार 206 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव*
August 29, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

  पुणे,दि.28 :- पुणे विभागातील 1 लाख 57 हजार 803 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 206 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 603 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.99 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 56 हजार 844 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 402 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 709 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.40 टक्के आहे. 

सातारा जिल्हा

   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 643 रुग्णांपैकी 6 हजार 455 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 843 आहे. कोरोनाबाधित एकूण 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हा

    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 853 रुग्णांपैकी 12 हजार 288 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 860 आहे. कोरोनाबाधित एकूण 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

  सांगली जिल्हा

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 830 रुग्णांपैकी 5 हजार 381 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 66 आहे. कोरोनाबाधित एकूण 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 36 रुग्णांपैकी 12 हजार 277 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 125 आहे. कोरोनाबाधित एकूण 634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 839 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 703, सातारा जिल्ह्यात 505, सोलापूर जिल्ह्यात 194, सांगली जिल्ह्यात 445 तर कोल्हापूर जिल्ह्यात 992 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 98हजार 657 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 16 हजार 206 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

( टिप :- दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

                         *****