ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुण्याचे जिल्हाधिकारी मा. नवल किशोर राम यांची अचानक बदली*....  *बदलीचे सत्र सुरू च*
August 4, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

 

*

*पुणे : -* गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच पुण्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पुण्यात याआधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राम यांच्यानंतर पुण्याचा नवीन उत्तराधिकारी कोण याची घोषणा आज संध्याकाळपर्यंत करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

 

सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा नवीन अधिकाऱ्यांवर निश्चित दबाव असणंर आहे. परंतु, पुणेकरांच्या नवीन जिल्हाधिकारी कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

कोरोनाकाळात नवल किशोर राम यांनी जोखीम पत्करून काही निर्णय घेत पुण्यातील परिस्थिती

 

उत्तमपणे हाताळली होती. आरोग्य विभाग व सरकारकडून घेण्यात आली असून त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातुन केंद्र सरकारच्या कार्यालयात नियुक्ती झालेले राम हे आत्तापर्यंतचे पुण्यातील तिसरे अधिकारी ठरले आहे.

 

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची उत्तम सांगड घालत ही जबाबदारी सक्षमपणे व यशस्वीपणे पार पाडली होती. 

 

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.