ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
मुंबईत १,४०० वीजचोर.
October 16, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

....

मुंबई : वीजचोरांविरोधात बेस्ट उपक्रमाने केलेल्या कारवाईत १,४०७ वीजचोरांकडून तब्बल साडेआठ कोटींची वसुली करण्यात आली.

 २०१९-२०२० मध्ये ही कारवाई केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. 

बेस्टचा विद्युत विभागाला वीजचोरीचा नेहमीच फटका बसतो. 

छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांपासून घरगुती वीज वापरकणार्याकडून मीटरमध्ये फेरफार केलेले आढळतात, तर अनधिकृत झोपडपट्यांमध्येही अवैध जोडणी करून वीज वापरली जाते. 

अशा वीजचोरांवर बेस्टच्या विद्युत विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई केली जाते. 

दक्षता विभागाने २०१८-१९ मध्ये १ हजार ६९५ वीजचोरांवर कारवाई केली होती आणि ८ कोटी ७५ लाख दंड वसूल केला. 

२०१९-२० मध्ये १ हजार ४०७ वीजचोर पकडण्यात आले आणि ८ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल केल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले. 

अँटोप हिल, धारावी, दारूखाना, कर्णाकबंदर, 

कुलाबातील गीता नगर या भागांत सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. 

धारावीत प्लास्टिक वितळवून त्यापासून वस्तू बनवणारे काही कारखाने आहेत.

 येथे २४ तास काम चालते. प्लास्टिक वितळवण्यासाठी जास्त वीज लागत असल्याने येथे वीजचोरी होते.

 तसेच काही झोपड्यांमधूनही वीजचोरी होत असल्याचे सांगण्यात आले.