ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
विराज जगताप यांच्या कुटूंबांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली भेट  
June 15, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

विराज जगताप यांच्या कुटूंबांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली भेट  

 

 

 

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे ७ जून रोजी विराज जगताप या बौध्द तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. रविवारी साय सध्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार यांनी समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व विरोधी पक्षनेते, स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व अशोक बँकेचे अशोक शीलवंत उपस्थित होते.   

 

यावेळी विराजच्या आईने सांगितले की आमच्या गावातील ग्रामस्थांची मीटिंग झाली. यामध्ये या घटनेला कोणीही जातीय रंग देऊ नये अशी विनंतीही त्यांनी अजितदादा पवार यांच्यासमोर बोलून दाखवली.