ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
शहर व ग्रामीण भागातील खाजगी शाळा फी साठी सर्व सामान्य जनतेला त्रास देत आहे.
June 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

प्रति,

मा.जिल्हाधिकारी साहेब,सातारा

 

यांस..

 

मा.महोदय,

          छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने मी सागर भारत साळुंखे आपणास निवेदन असे की,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराडमधील व अन्य शहर व ग्रामीण भागातील खाजगी शाळा फी साठी सर्व सामान्य जनतेला त्रास देत आहे.

खाजगी शाळेवाले फी, पुस्तके,बुट, ड्रेस,कॉम्प्युटर, लॅपटॉप ,मोबाईल व शैक्षणिक साहित्य घेण्यास जबरदस्ती व दबाव टाकत आहेत.वारंवार ऑनलाईन पेमेंटची मागणी करत आहे.मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल त्यामुळे त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून वेगळी रूम देण्यात यावी. आशा प्रकारचे मेसेज पालकांना करत आहे.मोबाईल मुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर व डोळ्यांवर आघात होऊ शकते.अशा बिकट परिस्थितीत गरीब व सामान्य पालक फार चिंतेत पडला आहे.

देशाचा खरा सर्वांगीण विकास आर्थिक दृष्टीने मजबूत करण्यासाठी शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे सर्व मानवी जीवनाचे संतुलन बिघडले आहे.यात मजूर,शेतकरी दुकानदार, नोकरी करणारे असे अनेक गरीब व मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचा उदर निर्वाह चालविणे कठीण झाले आहे.आशा पालकांवर खाजगी शाळेचे अवाढव्य शुल्क कसे भरावे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

आज खाजगी शाळेमुळे शिक्षणाचे बाजारीकरण करून त्याला एक कमाईचे साधन बनवले जात आहे.परंतु यांना पालकांच्या आर्थिक व मानसिकतेच्या अडचणीशी काहीही देणेघेणे नाही.

जोपर्यंत सरकारचा शाळा सुरू करण्याबाबत आदेश येत नाही तोपर्यंत शाळेचे शुल्क व शैक्षणिक साहित्य घेऊ नये.जेव्हापासून शाळा सुरू होईल व जेवढे दिवस शाळा सुरू राहील तेवढ्याच दिवसाचे शुल्क भरण्यात यावे.अशी मागणी मी सागर भारत साळुंखे व 

रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,अक्षय खाडे,कृष्णत तुपे,सुजित लादे,सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे,सागर शिंदे

छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने करण्यात येते.