ALL न्युज राजकारण मराठी / हिंदी सिनेमा टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
September 1, 2020 • santosh sangvekar • शिक्षण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

*..*  

       माननीय शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांनी काल कोथरूड येथील MAEERS MIT विश्वशांती गुरुकुल शाळेची CBSE NOC रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

     शाळेने ह्या वर्षी सर्व SSC बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद करून विद्यार्थ्यांना CBSE घ्या किंवा शाळा सोडून जा असे सांगितले होते. 

शाळेने SSC बोर्ड बंद केल्यामुळे गेले २ महिने SSC बोर्ड इंग्रजी माध्यमाचे साधारण ८००-९०० विद्यार्थी या मुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते.

गेले २.५ वर्षे शाळा विद्यार्थ्यावर CBSE लादण्याचा तालिबानी प्रकार करत होती त्या विरोधात वेळोवेळी पालकांनी आवाज उठवला होता. शाळेने पहिली पासुन एक एक वर्ष CBSE सुरु करावे आमची मुले SSC बोर्ड मधून पास होऊन द्यावीत एवढीच पालकांची न्याय मागणी होती.

 पण शाळेने मनमानी कारभार करत switch over category मधून शासनाची फसवणूक करून CBSE ची मान्यता मिळवली आणि पूर्ण SSC बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद केले. 

      *अपर मुख्य सचिव, शिक्षण, यावर आता तातडीने पुढील कारवाई करून, शाळेवर प्रशासक नेमून शाळेला SSC बोर्ड इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास भाग पाडतील,* अशी आशा पालक प्रतिनिधी संजय जोशी यांनी व्यक्त केली.

       सामान्य विद्यार्थी/पालकांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांवर मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केलेला हा प्रहार आहे असे मत पालक गजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.