ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
शेअर बाजाराला मोठा फटका; सेन्सेक्स ५६१.४५ अंकांनी गडगडला
June 26, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

 

मुंबई, २५ जून २०२०: बुधवारच्या व्यापारी सत्रात भारतीय बाजाराने संपूर्ण आठवड्यातील नफा गमावला. बाजार लाल रंगाच्या स्थितीत बंद झाला. निफ्टी १० हजारांच्या पातळीच्या पुढे राहिला, तरीही त्यात १.५८% किंवा १६५.७० अंकांची घट झाली. निफ्टी १०,३०५.३० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील १.५८% किंवा ५६१.४५ अंकांनी घसरून तो ३४,८६८.९८ अंकांवर बंद झाला. जवळपास १४२९ शेअर्स घसरले. १२४५ शेअर्सना लाभ झाला तर १३४ शेअर्स स्थिर राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

 

एशियन पेंट्स (३.८१%), आयटीसी (३.३६%), ईचर मोटर्स (३.१३%), हिरो मोटोकॉर्प (२.९४%) आणि गेल (२.९२%) हे आजच्या सत्रातील निफ्टी गेनर्स ठरले. तर आयसीआयसीआय बँक (७.१२%), इंडसइंड बँक (६.६४%), पॉवर ग्रिड (५.०९%), हिंडाल्को (४.५८%) आणि झी एंटरटेनमेंट (४.३७%) हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले. निफ्टी प्रायव्हेट बँकेचे शेअर्स ४.०१% नी घसरले. यासह हा एफएमसीजी सेक्टरसोबतचा सर्वाधिक नुकसानकारक कामगिरी करणारा सेक्टर ठरला. बीएसई मिडकॅपदेखील १.०९% नी घसरले. बीएसई स्मॉलकॅपनेही १.१५ टक्क्यांनी घसरण घेतली.

 

भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत खालवला. त्याचे मूल्य ७५.७२ रुपये प्रति डॉलर एवढे झाले. यासोबतच रुपयाने मागील दोन दिवसातील नफा गमावला. आंतरराष्ट्रीय सोन्याचे दर २०१२ पासून उंचावत असल्याने आजही सोन्याचे दर वाढलेले दिसून आले. एमसीएक्सवरील गोल्ड फ्युचर्स २०८ रुपयांनी वाढून ते ऑगस्ट महिन्याकरिता ४८,४४० रुपयांवर बंद झाले. त्यामुळे जागतिक सोन्याच्या खरेदीत मजबूत वाढ झाली.

 

युरोपियन मार्केटसह जागतिक बाजाराने जगभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याने कमकुवत कामगिरी केली. लॉकडाउननंतर जागतिक अर्थव्यवस्था सुधारत असली तरीही कोव्हिड-१९ च्या रुग्णात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर विपरित परिणाम झाला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.५९%, एफटीएसई १०० चे २.३१% नी, निक्केई २२५ चे शेअर्स ०.०७% नी तर हँग सेंगचे शेअर्स ०.५०% नी घसरले. नॅसडॅकचे शेअर्स ०.७४% नी वधारले.