ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
संतोष पाटील यांना डॉक्टरेट
September 12, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.. 

प्रतिनिधी 

 सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली . ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यातर्फे त्यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली . पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल भोकरदन येथे कार्यरत शिक्षक आहेत त्याच बरोबर ते व्याख्याते लेखक व समाजसेवक आहेत . ते आपल्या व्याख्यानाच्या मानधनातून विभिन्न वृद्धाश्रम अनाथालयांत धान्य व औषधी देत असतात . ते रस्त्यावर असणारे भिकारी व इतर गरजू लोकांना नियमित मदत करत असतात . बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचे कार्यसुद्धा त्यांनी केलेले आहेत . या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत . त्यांनी आतापर्यंत नॅशनल व वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावे आहे . डॉक्टर दत्ताजी शिंदे ,डॉक्टर विलास कदम , डॉक्टर संदीप सिंग यांच्या हस्ते त्यांना भारती विद्यापीठ नवी मुंबई येथे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली .आता आपला आत्मविश्वास अजून जास्त झाला असून सामाजिक कार्यात झोकून देण्याची त्यांनी बोलून दाखवले .