ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
साडेसात महिन्यांत १७४ मेट्रिक टन घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन ; कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लागल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत
October 16, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

....

 नाशिक : शहरात करोनाच्या आलेखात चढ-उतार होत असताना गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरातून मागील साडेसात महिन्यात जवळपास पावणे दोन लाख किलो अर्थात १७४.२७४ मेट्रिक टन घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. 

हा कचरा विल्होळीच्या प्रकल्पात शासनाच्या नियमावलीनुसार स्वतंत्रपणे ठेवून नष्ट करण्यात आला.

 घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने त्याद्वारे इतरांना प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील टळला आहे. 

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी घरगुती जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीविषयी माहिती दिली. 

मार्च महिन्यापासून आजवर शहरात करोनाचे तब्बल ५८ हजार १७८ रुग्ण आढळले. 

त्यातील ५३ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले. 

सध्या साडेतीन हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

 प्रारंभी करोनाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णांना लगेचच महापालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात असे. 

नंतर लक्षणे नसणारे, सौम्य, तीव्र लक्षणे नसणाऱ्यांना घरात स्वतंत्र खोली, काळजी घेण्यासाठी कोणी सदस्य असल्यास गृह विलगीकरणास परवानगी देण्यात आली. 

खासगी रुग्णांकडून आकारले जाणारे अवास्तव देयक, महापालिका रुग्णालयात खाटांची कमतरता अशा काही कारणास्तव त्रास होत नसलेल्या रुग्णांनी घरातच विलगीकरण करून उपचार घेणे पसंत केले. 

रुग्ण आढळलेल्या घराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावून आसपासच्या नागरिकांना खबरदारीचा संदेश दिला गेला.