ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
सात दिवसांत जम्बोतून एकही रुग्ण इतरत्र नेण्याची गरज भासली नाही
September 12, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

*

- *26 नवीन करोना रुग्णांना प्रवेश*

- *5 व्हेंटिलेटर, 5 ICU बेड तयार*

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयात अधिक सक्षमपणे सुविधा पुरवून रुग्णांची संपूर्णपणे देखभाल करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अधिक सुविधांच्या गरजेपोटी जम्बो सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयांत हलविण्याची आवश्यकता मागील सात दिवसात एकदाही भासलेली नाही. म्हणजे वैद्यकीय सल्ल्याने इतरत्र नेण्यासाठी डिस्चार्ज (Discharge Against Medical Advice- डामा डिस्चार्ज) देण्याची गरज आठवड्यात एकदाही भासलेली नाही, असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

     ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तसेच, आज 26 नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला. गुरुवारपासून येथे प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली असून, गुरुवारी चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला, तर शुक्रवारी 26 रुग्ण दाखल करण्यात आले, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. 

      दरम्यान, येथे आज पाच आयसीयू, तर पाच व्हेंटिलेटर बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पाऊले उचलत आहेत याचा सकारात्मक परिणाम येथील सेवेत दिसत आहे. 

श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आज 31 नातेवाईकांनी रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यामुळे रुग्णांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.