ALL न्युज राजकारण मराठी / हिंदी सिनेमा टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
सायकल मॅरेथॉनचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.*
March 2, 2020 • santosh sangvekar • क्रीडा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

*लायन्स, लायनेस, लिओ क्लब, कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशन व न्यू हिंद सायकल शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोपरगाव शहरात आयोजित सायकल मॅरेथॉनचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.*

यावेळी स्वतः सायकल मॅरेथॉनमध्ये सायकल चालवत आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगावकरांचा उत्साह वाढवला. कोपरगाव शहरातील नागरिकांनीही या सायकल मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद दिला. श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोदावरी पेट्रोल पम्प, श्री. छत्रपती संभाजी महाराज पुतळा, मुर्शतपुर फाटा ते धारणगाव रोड मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा या सायकल मॅरेथॉनचा मार्ग निश्चित करण्यात आला होता.

यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, जी.प. सदस्य राजेश परजणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, युवकअध्यक्ष नवाज कुरेशी, फकिरमामु कुरेशी, संदीप कपिले, बाळू शिंदे, बाला गंगूले, संजय काळे, मनोहर कृष्णाणी, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. गणेश शेटे, जयहिंद सायकलचे श्री. क्षत्रिय, लायन्स, लायनेस, लिओ क्लब व कोपरगाव केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*

*संपादक संतोष सागवेकर,*

*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*

*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*