ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
सेन्सेक्सची २०० अंकांनी उसळी; निफ्टी ११,२०० अंकांपुढे
July 24, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

मुंबई, २३ जुलै २०२०: मागील सत्रात विक्री झाल्यावर भारतीय बाजाराने आज वेग पकडला. ऊर्जा, फार्मा आणि वाहन क्षेत्रात आज खरेदीसह सकारात्मक व्यापार दिसून आला. निफ्टी ०.७४% किंवा ८२.८५ अंकांनी वाढला व तो ११,२१५ अंकांवर स्थिरावला. निफ्टीने आज यशस्वीरित्या ११,२०० अंकांची पातळी पार केली. तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सने ०.७१% किंवा २६८.९५ अंकांची बढत घेतली व तो ३८.१४०.४७ अंकांवर स्थिरावला.

 

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४३६ शेअर्सनी नफा कमावला तर १४५ शेअर्स स्थिर राहिले. तर ११८४ शेअर्सनी घसरण घेतली. आयशर मोटर्स (४.८७%), एसबीआय (३.२६%), आयसीआयसीआय बँक (३.५९%), आयओसी (२.४५%) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (३.५९%) हे आजच्या निफ्टी गेनर्समध्ये समाविष्ट झाले. तर निफ्टीतील टॉप लूझर्समध्ये अॅक्सिस बँक (३.७७%), श्री सिमेंट्स (१.९१%), एचयूएल (१.४३%), इन्फोसिस (०.७२%) आणि टीसीएस (०.७६%) यांचा समावेश झाला. आयटी सेक्टर वगळता सर्व सेक्टरल निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.९८% आणि बीएसई स्मॉलकॅप हे ०.६१% नी वधारले.

 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: ८ व्यापारी सत्रानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे भांडवल १३ लाख कोटींपर्यंत पोहोचले. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ३.५९% नी वाढले व त्यांनी २,०७६.०० रुपयांवर व्यापार केला.

 

पीएनबी हौसिंग फायनान्स: २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पीएनबी हौसिंग फायनान्सच्या नफ्यात ९.५% घट नोंदली गेली. तर कंपनीचा महसूल १६.२% नी कमी झाला. तरीही कंपनीचा नफा ५.००% नी वाढला व त्यांनी २१०.१० रुपयांवर व्यापार केला.

 

एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३.६% नी वाढला तर महसूल १८.४% नी घसरला. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे स्टॉक्स ०.४१% नी घसरले व त्यांनी २,४९५.०० रुपयांवर व्यापार केला.

 

स्पाइसजेट लिमिटेड: स्पाइस जेट लिमिटेडच्या शेअर्सची किंमत ६४.६४% नी वाढली व त्यांनी ४९.६५ रुपयांवर व्यापार केला. अमेरिका आणि भारत यांच्यादरम्यान मान्यताप्राप्त सेवा चालविण्यासाठी एअरलाइन भारतीय नियोजित वाहक बनल्यानंतर बाजारात हे परिणाम दिसून आले.

 

भारतीय रुपया: सुरुवातीचा काही नफा गमावल्यानंतरही भारतीय रुपयाने आज काहीशी उच्चांकी कामगिरी केली. सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७४.७० रुपयांचे मूल्य गाठले.

 

सोने: अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावामुळे तसेच साथीमुळे हादरलेल्या अर्थव्यवस्थेतील मंदीची वाढती भीती यामुळे स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस ०.२% नी घसरले व त्यांने १,८६७.३६ डॉलर प्रति औंस एवढे मूल्य गाठले.

 

जागतिक बाजारात संमिश्र संकेत: ह्युस्टनमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेने चीनचा दूतावास बंद करण्याचा आदेश दिला. त्यानंतर आशियाई बाजारपेठेत आजच्या व्यापारी सत्रात संमिश्र ट्रेंड दिसून आला. युरोपियन बाजारपेठेतही काहीसा असाच कल दिसून आला. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.६१% नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.२१ टक्क्यांनी घटले. नॅसडॅक आणि हँग सेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.२४% आणि ०.८२% नी वाढले. तर निक्केई २२५ कंपनीचे शेअर्स ०.५८% नी घसरले.