ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
*अयोध्यातील राम मंदिर भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला* 
August 6, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

 

 

*अयोध्या –:* अयोध्येतील ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे लक्ष लागले होते, तो रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट आज दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंतांनी हजेरी लावल्याने अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले आहे.

 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. भूमिपूजन सोहळ्यादरम्यान अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा होता. 

 

दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान देण्यात आले होते . उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज हे मंचावर उपस्थित होते. यासर्वाच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.